बेळगाव : मजगाव येथील जागृत देवस्थान श्री ब्रम्हलिंग व कलमेश्वर देवस्थान येथे नावरात्रोत्सवाला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त देवस्थान पंच कमिटीमार्फत सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मंदिरात घटस्थापनेदिवशी भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांमार्फत पाना-फुलांची आरास करून पूजा करून गाऱहाणे कार्यक्रम होतो. रोज सीमोल्लंघनपर्यंत कार्यक्रम चालतो. अष्टमी दिवशी मंदिरात भरगच्च कार्यक्रम असतो. या दिवशी रात्री 12 वाजता आरती केली जाते. यावेळी मंदिराचे पुजारी आरतीचे ताट डोक्यावर ठेवून न धरता मंदिराला पाच फेऱया मारतात. यानिमित्त गावातील शेकडो भाविक दहा दिवस उपवास करून मंदिरामध्येच वास्तव्य करून सीमोल्लंघनदिवशी उपवास सोडतात. सीमोल्लंघन ब्रम्हनगर येथील ‘बन्नी भरमाप्पा’ या ठिकाणी उत्साहात साजरे केले जाते.









