औंध / वार्ताहर :
असवली ता. खंडाळा येथील नवनाथ ढमाळ यांची मनमा (बहरीन) येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. 2 ते 20 जुलै या कालावधीत 15 आणि 20 वर्षाखालील वयोगटात ही स्पर्धा होणार आहे.
ढमाळ असवली ता. खंडाळा येथील विद्यमान उपसरपंच आहेत. यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्यावतीने त्यांची या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल त्यांचे कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, संपत साळुंखे, प्रा दिनेश गुंड, ललित लांडगे, यांनी अभिनंदन केले आहे.









