शिक्षेदरम्यान रजा न घेतल्याने मुदत संपण्यापूर्वी मुक्तता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचे माजी आघाडीचे फलंदाज आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांची आज 1 एप्रिल रोजी कारागृहातून सुटका होणार आहे. सिद्धू यांच्या ट्विटर पेजवर शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. वरि÷ अधिकाऱयांनी सुटकेची माहिती दिल्याचे ट्विटमध्ये लिहिले आहे. शिक्षेदरम्यान एकही रजा न घेतल्याचा फायदा नवज्योतसिंग सिद्धू यांना मिळत आहे. रोड रेजप्रकरणी 19 मे 2022 रोजी त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 20 मे 2022 रोजी सिद्धू यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. नवज्योतसिंग सिद्धूच्या सुटकेबाबत डिसेंबर 2022 पासूनच चर्चा सुरू झाली होती. पंजाब काँग्रेसचा मोठा वर्गही सिद्धूच्या स्वागताच्या तयारीत गुंतला होता. 26 जानेवारी 2023 रोजी नवज्योतसिंग सिद्धूची सुटका होईल, अशी सर्वांना आशा होती. 26 जानेवारीला सकाळपासूनच समर्थक तुरुंगाबाहेर पोहोचले, मात्र सिद्धू यांना सोडण्यात आले नव्हते. चांगल्या वर्तणुकीमुळे प्रजासत्ताक दिनी तुरुंगातून सुटणार असलेल्या सुमारे 56 जणांची फाईल तुरुंग प्रशासनाकडून तयार करण्यात आली होती. तथापि, प्रजासत्ताक दिनापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला नव्हता. तसेच सदर ठराव ना मंत्रिमंडळात मंजूर झाला ना तो पंजाबच्या राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेला. या यादीत नवज्योत सिंग सिद्धू यांचे नाव नसल्याचे काहींनी सांगितले.
पत्नी नवज्योत कौर कॅन्सरने त्रस्त
नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर कर्करोगाने ग्रस्त आहे. तिला स्टेज-2 कॅन्सर आहे. अलीकडेच, नवज्योत कौरने पती सिद्धूसाठी एक संदेश लिहिला होता. त्यात ‘आपल्या सुटकेची प्रतीक्षा करू शकत नाही. माझा त्रास वाढत आहे’ असे लिहिले होते. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक वरि÷ नेत्यांनीही सिद्धू यांना लवकर सोडण्याची मागणी केली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांना 34 वर्षांपूर्वीच्या एका मारामारी प्रकरणात मे-2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. 27 डिसेंबर 1988 या दिवशी सिद्धू यांचे पतियाळा येथील रस्त्यावर एका कार पार्किंगच्या संदर्भात वयोवृद्ध व्यक्ती गुरुनाम सिंग यांच्याशी भांडण झाले होते. त्यांच्यात मारामारीही झाली होती आणि या मारामारीमुळे गुरुनामसिंग यांचा नंतर मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर सिंग यांच्या विरोधात अनुद्देsश हत्येचा गुन्हा नोंद केला होता. सत्र न्यायालयाने सिद्धू यांची निर्देष मुक्तता केली. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दोषी धरत तीन वर्षांच्या कारावासासह 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने 16 मे 2018 या दिवशी अनुद्देश हत्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र समोरील व्यक्तीला गंभीर जखमी करण्याच्या आरोपात 1 वर्षाची शिक्षा दिली होती.