ओटवणे प्रतिनिधी
असनिये हे गावचे ग्रामदैवत श्रीदेवी माऊली मंदिरात पुरुषोत्तम मास निमित्त गुरुवारी १० ऑगस्ट रोजी नवचंडी या धार्मिक आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त मंदिरात सकाळी ९ वाजता प्राकार शुद्धी, त्यानंतर देवतांचा कौल, सकाळी दहा वाजता नवचंडी धार्मिक कार्यक्रमाला विधीवत प्रारंभ, दुपारी १:३० वाजता पूर्णाहुती त्यानंतर महाआरती व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ४:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद रात्री ९ वाजता राजस्थानचे भजने होणार आहेत.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच असनिये ग्रामस्थांनी केले आहे.
Previous Articleहरकती फेटाळल्याबाबत कागदपत्रे देण्यास टाळाटाळ
Next Article बेळगावमध्ये 20 रोजी ‘गृहलक्ष्मी’चा शुभारंभ









