कोल्हापूर प्रतिनिधी
शिक्षण विभागातर्फे आयोजित नवभारत साक्षरता कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला आहे. हे काम दुसऱ्या यंत्रणेकडून करून घ्या. शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियानचे काम शिक्षकांना लावल्यास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा निवेदनाव्दारे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देण्यात आला.
निवेदनात म्हंटले आहे, शिक्षकांना अध्यापनापेक्षा जास्त अशैक्षणिक काम सरकार लावत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होवू लागले आहे. अध्यापनापेक्षा जास्त अशैक्षणिक कामात शिक्षकांचा वेळ जात असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर बहिष्कार टाकणार आहे. त्यामुळे हे काम इतर यंत्रणेकडून करून घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा ईशारा देण्यात आला. यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, प्रभाकर हेरवाडे, सी. एम. गायकवाड, सुरेश संकपाळ, खंडेराव जगदाळे, राजेंद्र कोरे, राजाराम वरूटे, भरत रसाळे, आदी उपस्थित होते.









