गतवर्षीपेक्षा दरात वाढ : तयार पदार्थांना ग्राहकांची पसंती
प्रतिनिधी / सांगली
हिंदू धर्मियांच्या महत्वाच्या सणांपैकी एक समजला जाणारा नवरात्रोत्सव गुरुवारच्या घटस्थापनेपासून सुरु झाला. या सणातील नऊ दिवस व नवरात्रींना असणारे महत्व लक्षात घेता, अनेक महिला-पुरुष भाविक देवीच्या उपासनेनिमित्त उपवास धरतात. या भक्तीमार्गात उपवासाला महत्वाचे स्थान असले तरी, उपवासाठी खाल्या जाद असलेल्या फळाच्या, पदार्थ्यांच्या दरात किंचीत वाढ झाली असल्याने यंदा नवरात्रीचा उपवास महागला आहे. यानिमित्ताने उपवासांच्या तयार खाद्यपदार्थांची बाजारात रेलचेल झाली आहे.
या सणातील उपवासानिमित्त कुटुंबातील काही व्यक्ती नऊ दिवसांचा उपवास करतात. तर काही पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी असा देव बसताना व उठताना दोनच दिवस उपवास करतात. यासाठी पारंपारिक घरगुती पदार्थ करण्याबरोबरच बाजारातूनही तयार उपवासाचे पदार्थ हमखास आणले जातात. पण त्याला जादा दर असतो. शिवाय दरवर्षी कच्चा माल खाद्यतेल, मजुरी आदींच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत असल्याने, त्यांच्या किंमती मागील वर्षीपेक्षा थोड्या वधारलेल्याच आढळून येत आहेत. खिचडीसाठी लागणारा शाबुदाणा, शेंगदाणा व यरीचे तांदूळ यांचेही दर वाढलेलेच आहेत. शिवाय तयार फराळामध्ये जास्त मागणी असणा-यापैकी शाबुचिवडा, बटाटा चिप्स, चिक्की या पदार्थाच्या दरातही वाढ झालेली आहे. तर फळांमध्ये खजूर, बटाटा, केळी, आदींच्याही दरात यंदा किरकोळ वाढ झालेली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








