वेंगुर्ले (वार्ताहर)-
आडेली-भंडारवाडी येथील नागरिकांना गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री यांनी दिलेल्या निधीतूनसाकारलेल्या गणेश तळीच्या कामाचा शुभारंभ आडेली सरपंच यशश्री कोंडसकर यांच्या हस्ते व शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला .
आडेली-भंडारवाडी येथीलनागरिकांना गणेश मुर्तीच्या विसर्जनात येणारी समस्या लक्षात घेऊन शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजेरकर यांनी स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार २५/१५ ग्रामविकास निधी मंजूर झाला होता. सदरचे काम युध्दपातळीवर नितीन मांजरेकर यांनी पुर्ण करून घेतले. या कामाचा शुभारंभ आडेली सरपंचा सौ. यशश्री कोंडसकर यांच्या हस्ते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रीफळ वाढवून झाले. आडेली-भंडारवाडी येथील नागरिकांना गणेश विसर्जन करता येणार आहे.
आडेली सरपंच यशश्री कोंडसकर, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजेरकर, ग्रामस्थ सुधीर धुरी, भूमी सावंत, मयुरेश घाडी, बाळू सावंत, सिध्देश टेंमकर, गजानन बांदीवडेकर, मनोहर सावंत, केशव सावंत, विनोद सावंत, अजय टेमकर ओंकार सावंत, मोहिल सावंत, प्रसाद सावंत, गजानन सावंत, प्रणम सावंत. मिलींद बोवलेकर आद उपस्थित होते.









