कुणालाच न घाबरणारा प्राणी, विषाचाही होत नाही परिणाम
बालपणी आपण सर्वांनी जंगलाच्या कहाण्या ऐकल्या असतील, त्यात जंगलाचा राजा सिंह असतो असे सांगण्यात येते, परंतु एक प्राणी या सर्वांपेक्षा वरचढ ठरत असतो. अनेक प्राणी स्वत:च्या विचित्र वैशिष्ट्यांमुळे ओळखले जातात. अशाच एका प्राण्यावर विषाचा परिणाम होत नाही तसेच अन्य कुठल्याही प्राण्याला घाबरत नाही. याला निसर्गाचा सुपर हीरो म्हणूनही ओळखले जाते. हनीबेजर जगातील सर्वात निडर प्राण्यांपैकी एक आहे. या छोट्या जीवाला याचमुळे निसर्गाचा सुपर हीरो म्हटले जाते.
याचे शरीर इतके लवचिक असते की एखाद्या शिकाऱ्याने त्याला पकडले तरीही तो स्वत:ची त्वचा वळवून प्रति प्रहार करू शकतो. हनीबेजर विषालाही घाबरत नाही. ते सापांना मारून खात असते. सापाने दंश केला तरीही हा प्राणी काही वेळासाठी बेशुद्ध होऊ शकतो, परत पुन्हा शुद्धीत येत सापाची शिकार करतो. याची शूरता आणि जिद्द पाहून वैज्ञानिकही थक्क होतात. या प्राण्याला छोटा सैतानही म्हटले जाते. हा प्राणी आफ्रिका, मध्यपूर्व आणि दक्षिण आशियात आढळून येतो.
दात याची खरी शक्ती
हनीबेजर साप, चित्ता आणि अन्य धोकादायक प्राण्यांना घाबरत नाही. या प्राण्याला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात निडर प्राणी म्हणून नोंदविण्यात आले आहे. याचबरोबर कोल्ह्यासारख्या प्राण्यांच्या नाकीनऊ आणण्याचे काम हा प्राणी करतो. लढण्यासोबत हा अत्यंत बुद्धीवान प्राणी आहे. याचा आकार तीन फुटांपर्यंत असतो. हनी बेजरच्या शरीरावर डोक्यापासून शेपटापर्यंत एक पांढरा पट्टा दिसून येतो. मजबूत शरीरासाब्sात दात हनीबेजरची खरी शक्ती असतात.









