ओटवणे प्रतिनिधी
माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक सिद्धेश सुधाकर कानसे यांनी रेखाटलेल्या निसर्गचित्राची राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि स्पर्धा २०२३ साठी निवड करण्यात आली आहे. कला महर्षी बाबुराव पेंटर आर्ट फाउंडेशन तर्फे आयोजित राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि स्पर्धा पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात होणार आहे.
या राष्ट्रीय कला प्रदर्शनात देशभरातील विविध कलावंतांच्या एकूण ५०० कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात २ जून ते ४ जून पर्यंत सकाळी ८:३० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले असणार आहे.
सिद्धेश कानसे यांची राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार , सचिव सी . ए लक्ष्मण नाईक , मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .









