18 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात नैसर्गिक आपत्तींमुळे 2022-23 मध्ये एकूण 1997 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 30,615 पशूंना जीव गमवावा लागला आहे. आपत्तींमुळे 18,54,901 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे.
हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारताचा समावेश आहे. यामुळे देशात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत जाणार आहे. आशिया पॅसिफिक डिझास्टर रिपोर्टनुसार भारतातील गरीब लोकांवर आजार, नैसर्गिक आपत्तींचे संकट घोंगावत आहे.2047 पर्यंत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील सुमारे 71 टक्के लोकसंख्या हवामान बदलामुळे होणाऱया आपत्तींची शिकार ठरण्याची भीती आहे.









