यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल़ा त्यानंतर पाऊस बेताचा राहिला असला तरी ठिकठकाणी दुर्घटना घडल्या आहेत़ यातील काही दुर्घटना या जोखीम क्षेत्रातील आहेत़ तर काही दुर्घटना अचानक कोसळल्या आहेत़ काहीठिकाणी आवश्यक ती काळजी घेणे शक्य होत़े परंतु ती घेतली गेली नाही, असेही दिसून आले आह़े प्रत्येक घटना काही संदेश असत़े तो संदेश सामाजिक जीवनात घेतला गेला तर जीवन अधिक सुसह्य होईल़
नैसर्गिक आपत्ती आणि पावसाळ्dयात उद्भवणाऱ्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोखीमग्रस्त 16 गावे आणि नदीकाठची 206 गावांमध्ये पावसाळ्यात साथीचा उद्रेक वाढू नये यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्यासाठी आवश्यक नियोजन केले आह़े
संभाव्य पुरग्रस्त पेंवा जोखीमग्रस्त गावांच्या ठिकाणी वेशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या आले आह़े मागील 5 वर्षात डेंग्यु, चिकुनगुन्या,
गॅस्टो, अतिसार, कॉलरा, विषमज्वर, ताप उद्रेक हिवताप, काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा झालेल्या गावांवर खास लक्ष देण्यात येत आह़े दरम्यान दापोली शहरातील टांगर गल्ली येथे एका रहिवासी इमारतीवर लगतचा मातीचा डोंगर चिऱ्यांसह कोसळल्याने इमारतीतील सदनिकेचे प्रचंड मोठे नुकसान झाले. यातील एक सदनिकाधारक केवळ दोन सेकंदाच्या अंतराने बालमबाल बचावल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दापोली शहरातील टांगर गल्ली येथे एस. एम. हार्मोनी नावाची रहिवासी इमारत आहे. ही इमारत बांधताना बांधकाम व्यावसायिकाने उभा डोंगर कापून इमारती करता जागा करून ही इमारत बांधली आहे. या इमारती लगतचा मातीचा डोंगर कोसळून नये याकरिता बांधकाम व्यावसायिकाने केवळ चिऱ्याची भिंत उभी केली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसाने येथील माती सैल होऊन ही भिंत मातीसह कोसळली. यामुळे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रेहाना शेख यांच्या बेडरूमच्या भिंतीवर ही भिंत कोसळून भिंतीतील चिरे व बिम थेट बेडरूम मध्ये येऊन पडला. रेहाना या दोन सेकंदापूर्वीच बेडरूम मधून बाहेर आल्याने त्या बचावल्या.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळण्याचे सत्र कायम असून शनिवारी परशुराम घाटामध्ये एका लेनवर दरड कोसळली. मात्र वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू राहिल़ी कंत्राटदार कंपनीकडून ही दरड नंतर बाजूला करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल येथे दरड कोसळल़ी या दुर्घटनेमध्ये कुटुंब बालंबाल बचावल़े याशिवाय रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात वादळी वारा व पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले आह़े सिंधुदुर्गात 60 पेक्षा जास्त घरांना वादळी पावसाचा तडाखा बसला आह़े रत्नागिरी जिह्यातील वाशिष्टी नदीपात्रामध्ये यापुढे पाण्याचा प्रवाह वाढेल, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आह़े कोयना टप्पा चार मधील वीज निर्मिती नियमितपणे सुरू करण्यात येणार असल्याने काठावरच्या नागरिकांना हा इशारा देण्यात आल़ा याशिवाय सिंधुदुर्ग जिह्यातील माडखोल, हरकुळ, कोर्ले-साकडी, अरूणा धरणातील पाण्याची पातळी वाढल़ी यापैकी बऱ्याच ठिकाणी विसर्ग सुरू करण्यात आला आह़े यामुळे काठावरचे लोक अधिक सतर्क राहिले आहेत़ मालवण तालुक्यातील आचरा येथे आंब्याचे भले मोठे झाड महिलेच्या अंगावर कोसळल़े तथापी ही महिला पूर्णपणे बचावल़ी तिच्या डोक्याला आंब्याच खोड व मोठ्या फांद्या न लागल्याने सुरक्षित राहिल़ी तथापी या घटनेत ती गंभीर जखमी झाल़ी
रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिह्यात शेकडो झाडे उन्मळून पडल़ी वैभववाडी तालुक्यात सोनाळीमध्ये पुरात वाहून गेलेल्या म्हशीचा मृत्यू झाल़ा रत्नागिरी जिह्यात चिपळूण परिसरातील कळवंडे धरण हे जोखीमग्रस्त बनले आह़े या धरणाच्या नव्याने केलेले पिचिंग कोसळल्यामुळे या परिसरातील लोकांची धाकधूक वाढली आह़े धरणावर लक्ष ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने एक पथक तयार केले आह़े या पथकाने धरणावर रात्रंदिवस लक्ष ठेवावे असे फर्मावण्यात आले आह़े
रत्नागिरी तालुक्याती आडी-शिरगाव प्राथमिक शाळेवर झाड कोसळल़े गेल्या आठवड्यात बुधवारी सव्वाबारा वाजता ही घटना घडल़ी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग शाळेत सुरू असताना शाळे शेजारचा प्रचंड वृक्ष शाळेवर कोसळल्याचे लक्षात येताच सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पेंद्रप्रमुख यांनी शाळेला भेट दिल़ी मात्र शाळा परिसरातील मोठे वृक्ष कोसळण्याची शक्यता असलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप तयार केलेली नाह़ी दुर्घटना झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी घटनास्थळी धाव घेतात़ ही बाब चांगलीच आहे पण या दुर्घटनेतून काही शिकाव़े भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून योजना तयार व्हावी हा मुद्दा मात्र खूप दूर राहत़ो
पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची शक्यता कोकणात सर्वाधिक प्रमाणात असत़े त्याला नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत असत़े याशिवाय संभाव्य धोके कसे ओळखावे याविषयीचे मुद्दे प्रशिक्षणात समाविष्ट असतात़ तथापी सार्वजनिक ठिकाणी दुर्घटनांपासून दूर रहावीत यासाठी पावले उचलली गेल़ी, असे म्हणणे धाडसाचे ठरेल़
कोकणामध्ये विशिष्ट प्रमाणात पाऊस आणि सोबत वारा या बाबी नियमितपणे घडत आहेत़ याचा शेती आणि जनजीवनावर परिणाम होत असत़ो एका बाजूला नैसर्गिक बाबी घडत असल्या तरी दुसऱ्या बाजूला पर्यावरण आणि जनजीवन धोक्यांच्या बाहेर रहाव़े यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी गरजेची आह़े जेथे दुर्घटना घडतात तेथे या दुर्घटनेचा अंदाज लावण्यात लोकसेवकांपैकी कोणते लोक अपयशी ठरले याची पडताळणी होत नाह़ी वरिष्ठ स्तरावर धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी जबाबदार लोकांना अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत करण्याची गरज आह़े
सुकांत चक्रदेव








