वारणानगर / प्रतिनिधी
आई – वडिलानी कामावर जा असे सांगीतल्याच्या रागातून राहत्या घरातून बाहेर पडलेल्या उमेश पांडरंग पाटील वय ४० रा. नाटोली ता.शिराळा जि.सांगली याने नावली ता. पन्हाळा येथील शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
बाळासाहेब लक्ष्मण पाटील रा. नाटोली यानी कोडोली पोलीसात वर्दी दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज गुरूवार दि. १८ रोजी दोन वा. चे सुमारास नावली ता. पन्हाळा येथील नानासो पाटील यांचे कुंभार घोल नावाचे शेत जमिनीत लिंबाचे झाडास दोरीने गळ्यास गळफास लावुन आत्महत्या केली. त्यास वर्दीदार बाळासाहेब पाटील व त्यांचे नातेवाईक यांनी खाली उतरून औषधोपचाकरीता उपजिल्हा रूग्णालय कोडोली येथे घेवुन गेले असता तेथील डॉक्टरानी त्यांना तपासुन ४ वा. च्या सुमारास औषधोपचारापुर्वी मयत झाले असलेबाबत सांगितले. कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस हावलदार चिले, पो.ना. यादव, पो.कॉ. खताळ तपास करीत आहेत.








