बेळगाव : विजापूर येथील सैनिक स्कूल आयोजित अखिल भारतीय आयपीएससी मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाली. या स्पर्धेत देशातील नामांकित आयपीएससी शाळेच्या टेबल टेनिसपटूंनी भाग घेतला होता. विजापूर येथे आयोजित केलेल्या या टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक स्कूलचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन प्रतिभा बिस्तसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रथमच मुलींच्या अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन विजापूर येथे करण्यात आले आहे. मुलांच्याबरोबर मुलीही खेळामध्ये मागे नसून खांद्याला खांद्या लावून सर्व स्तरात मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा लाभ या विद्यार्थ्यांनी घ्यावा या स्पर्धेत मध्यप्रदेशातील एम्ब्राल्डा व्हाईट आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल स्कूल इंदौर, सिंधिया कन्या विद्यायल ग्वालियर, फिनिक्स स्कूल बेळगाव, कित्तूर राणी चन्नम्मा गर्ल्स रेसिडन्सी सैनिक स्कूल बेळगाव, सैनिक स्कूल विजापूरसह अनेक शाळेने भाग घेतला होता. यावेळी टेबल टेनिसपटू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक उपस्थित होते.
Previous Articleआर्म रेसलिंगमध्ये बेळगावच्या खेळाडूंचे यश
Next Article कुस्ती संघटनेतर्फे 13 जानेवारीला मैदान









