वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये 28 जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेचे बोधचिन्ह ‘मोयुली’ असे असून या क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे आणि लोगोचे अनावरण केंद्रिय क्रीडा युवजन खात्याच्या राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तराखंडचा पक्षी मोनल हे या क्रीडा स्पर्धेचे बोधचिन्ह आहे. या क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे, जर्सी, क्रीडाज्योत, क्रीडागीत यांचे उद्घाटन रक्षा खडसे यांनी केले. ‘संकल्प से शिकार त्तक’ असे बोधगीत राहणार आहे. या समारंभाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि क्रीडाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









