वृत्तसंस्था / पिथोरगड (उत्तराखंड)
डेहराडूनमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचा प्रवास विविध राज्यांतून सध्या सुरू आहे. या क्रीडाज्योतीचे शनिवारी बागेश्वरमध्ये आगमन झाले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी 26 डिसेंबर रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्योतीच्या रॅलीचे उद्घाटन केले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच यावेळी उत्तराखंड भूषवित आहे. 25 जानेवारी रोजी ही क्रीडाज्योत डेहराडूनमध्ये दाखल होईल. या क्रीडाज्योतीचा प्रवास 13 जिल्ह्यातील 99 क्रीडा केंद्रातून होणार आहे. या क्रीडाज्योतीचे नामकरण तेजस्वीनी असे करण्यात आले आहे. तेजस्वीनीचा प्रवास सुमारे 3823 कि.मी. राहिल.









