प्रतिनिधी/ बेळगाव
जीएसएस कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने एसकेई सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू यांचे व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या भाषणात पारंपरिक ज्ञान, रोजच्या जीवनात येणारे विज्ञान, कुंभमेळ्यातील विज्ञान व पर्यावरणीय ज्ञानाचा परस्परांशी मेळ घातला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य अभय सामंत होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी शीतपेय, इतर खाद्यपदार्थ व रोजच्या जीवनातील वस्तूंची शुद्धता तपासून घेण्याचे आवाहन केले. सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप देशपांडे यांनी स्वागत केले व विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन प्रा. चारुशिला बाळेकाई यांनी केले. प्रा. विनया पित्रे यांनी आभार मानले.









