कृष्णात पुरेकर,कोल्हापूर
National Safe Motherhood Day : केंद्राने 11 एप्रिल 2003 रोजी कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिन मातृसुरक्षा दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून मातृत्व सुरक्षा दिनी विविध योजनांद्वारे सुरक्षित प्रसुती, माता, बालसंगोपनाला सरकारने प्राधान्य दिले आहे.गेल्या काही वर्षांत गर्भवतींचा कल सिझेरीयनकडे वाढला आहे. याला कारणीभूत ठरलीय ती गतिमान जीवनशैली, जंकफुडचा अतिवापर, व्यायामाचा अभाव. तिशीनंतर विवाह अन् त्यानंतर फॅमिली प्लॅनिंगमुळे मातृत्व असुरक्षिततेत आले आहे. जिल्ह्यात 20 वर्षांपुर्वीचे सिझेरीयनचे प्रमाण 15 टक्के होते ते आता 30 टक्क्यांवर पोहोचले आहे. मंगळवारी, 11 एप्रिलला राष्ट्रीय मातृत्व सुरक्षा दिन आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिंक प्रसुती का आवश्यक, यासाठी जनजागृतीच्यादृष्टीने आरोग्य विभागाने आरोग्य उपकेंद्र स्तरावर सर्व्हेक्षण सुरू केले आहे.
शिक्षणामुळे समाजात, मुलींमध्ये जागृती आली. त्यातूनच विवाहाचे वय वाढत गेले. पदवीधर झाल्यानंतर जॉब, आर्थिक सुरक्षितता अन् विवाह असे समिकरण पुढे आले. त्यातूनच सध्या मुलींचे विवाह तिशीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांत माता, बालमृत्यूचे कमी झालेले प्रमाण हे सुरक्षित मातृत्वासाठी राबवलेल्या आरोग्यदायी योजनांचे यश आहे.
तिशीतील तरूणींची रक्तदाब,मधुमेह तपासणी मोहीम सुरू
जिल्हा कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, तिशीनंतर गर्भवतींमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेहाची लक्षणे दिसत आहेत. अशावेळी आई अन् बाळाला वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकासमोर सिझेरियन हा एकमेव पर्याय असतो. शासकीय स्तरावर सिझेरीयन 5 टक्केच असायला हवे. पण जिल्ह्यात 20 वर्षांपुर्वी सिझेरीयनचे प्रमाण 10 ते 15 टक्के होते. आता ते 25 टक्क्यांवर पोहोचले आहे. यामागे बदलती जीवनशैली हे एक कारण आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर तिशीतील विवाहिता, तरूणींमधील रक्तदाब, मधुमेहाची तपासणी करून सर्व्हेक्षण मोहीम राबवली आहे.
कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई म्हणाल्या, जिल्ह्यातील सिझेरियनची टक्केवारी तिशीवर पोहोचली आहे. याला कारण उशिरा विवाह अन् फास्ट लाईफस्टाईल, अन् स्ट्रेस आहे. त्यामुळे गर्भारपणात बी.पी, शुगर वाढत आहे. अन् प्रसुतीदरम्यान डॉक्टरांसमोर वाढलेला रक्तदाब हाच आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे जीवनशैली अन् व्यायामासंदर्भात जागृती आवश्यक बनली आहे. गरोदर स्त्रियांनी योग्य जीवनशैली आणि सकस आणि योग्य आहार घेतल्यास प्रसुती सुखकर होईल. यासाठी वरचेवर तपासणी करून घेणे, ध्यान धारणा, यासारख्या गोष्टीचा अवलंब केल्यास सिझेरियनपेक्षा नॉर्मल प्रसुती होण्याकडे कल वाढेल.शासन तिशीनंतरच्या विवाहितांची बी.पी., मधुमेह तपासणी मोहीम आखली आहे. योग्य समुपदेशन आणि गरोदर स्त्रियांची योग्य जीवनशैली यामुळे सिझेरियनचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









