2 डिसेंबर 1984 च्या रात्री युनियन कार्बाइड कारखान्यात मिथाइल आयसो सायनाइड (MIC)ची गळती झाली होती. हा विषारी वायू हवेत मिसळल्याने तो दूरवर पसरला होता. या गॅस गळतीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. जगभरात प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. प्रदुषणाचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. हवेतील प्रदूषणाचा हृदय, मेंदू आणि फुफ्फुसावर गंभीर परिणाम होतो. तसेच कॅन्सरसारख्या आजारांनाही प्रदुषण कारणीभूत ठरत आहेत. प्रदूषण रोखण्यास मदत करणाऱ्या कायद्यांची जाणीव लोकांना करून देणे, औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रण याबाबत जागरूकता आणि औद्योगिक प्रक्रिया आणि मानवी निष्काळजीपणामुळे होणारे प्रदूषण रोखणे हे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करण्याचे उद्देश आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








