वार्ताहर कुडाळ
उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य (मुंबई ) व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ( ओरोस) यांनी दिलेल्या निर्देशाला अनुसरुन राष्ट्रीय लोकअदालत ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता येथील दिवाणी न्यायालयात आयोजित करण्यात आली आहे. ही लोक अदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच विज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था तसेच ग्रामपंचायतींनी आपल्याकडील जास्तीत जास्त वादपूर्व प्रकरणे दाखल करून मिठविण्यात यावीत. तसेच कोणत्याही पक्षकार व वकील यांस न्यायालयात प्रलंबित प्रकरणामध्ये लोकअदालतपूर्व आपल्या प्रकारणांची बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्यांनी १ ऑगस्ट पासून कार्यालयीन दिवशी दुपारी ०२ ते ०२.३० वेळ देण्यात येणार आहे. त्याकरीता संबंधीतांनी दिवाणी न्यायालय कुडाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश ए. जे. बाचुलकर व सह दिवाणी न्यायाधीश पी. आर. ढोरे यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









