प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस जीआयटी एमबीए कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन महोत्सव ‘अद्वैत 23’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक व्यंकटेश पाटील यांच्या हस्ते झाले.
व्यंकटेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत कौशल्य वाढविण्याचे आवाहन केले. कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर म्हणाले, हा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक संधी असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. प्राचार्य दिगंबर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी गुर्जर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजीव इंगळगी यांनी आभार मानले.









