नवी दिल्ली : कोरोनातून बरं झाल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांना आज (गुरुवारी) पुन्हा नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) अंमलबजावणी संचालनालयाने(ED) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने राहुल गांधींची सलग अनेक दिवस 51 तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. सोनिया गांधी यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची चौकशी थांबवली होती. मात्र आज पुन्हा त्यांना बोलवण्यात आले आहे. यामुळे राज्यभर काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत.दरम्यान, आज काँग्रेसने सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षांना दिल्लीत बोलावले आहे. (Sonia Gandhi Latest News)
काँग्रेसनं पुन्हा एकदा देशभरात ताकद दाखविण्याची घोषणा केलीय. त्याअंतर्गत आज दिल्ली, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुण्यामध्ये काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं. केंद्रातील मोदी सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणेचा गैर वापर करत असल्याचा आरोप करत पुणे शहर काँग्रेसकडून (Congress) आंदोलन करण्यात आलं.आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा- केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये आजपासून ई-ऑफिस प्रणाली लागू; केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती
या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर पूर्णपणे नाकेबंदी केली आहे. कार्यालयाच्या दोन्ही गेटवर हेव्ही बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांसोबतच राखीव दलही ठेवण्यात आले आहे. ईडीने सोनिया गांधी यांच्या चौकशीसाठी दोन सहायक संचालक आणि एका महिला सहायक संचालकांची नियुक्ती केली आहे. सोनियांच्या चौकशीसाठी ईडीने 50 हून अधिक प्रश्न तयार केले असल्याच समजतेयं.
Previous Articleअट्टहासापोटी लोकांमध्ये तेढ निर्माण करू नये
Next Article …तर सांगेत शेळ – मेळावलीची पुनरावृत्ती अटळ : पाटकर









