प्रतिनिधी /बेळगाव
इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमनच्या (आयआयएफ) बेळगाव शाखेतर्फे नुकताच नॅशनल फौंड्री डे साजरा केला. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयएफ दक्षिण विभागीय कार्यालयाचे चेअरमन एस. मुत्तुकुमार व उपाध्यक्ष संचित कित्तूर उपस्थित होते.
समवेत फौंड्री क्लस्टरचे चेअरमन राम भंडारे, आयआयएफचे चेअरमन आनंद देसाई, उपाध्यक्ष आदित्य पारीख, सचिव गौरव पंडित, खजिनदार विक्रम सैनुचे आदींनी दीपप्रज्वलन केले. आनंद देसाई यांनी आयआयएफबद्दल माहिती दिली. 17 ऑगस्ट 1950 रोजी 13 सदस्यांनी एकत्र येऊन आयआयएफची स्थापना केली. तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय फौंड्री दिन म्हणून साजरा केला जातो.
2021-22 साली उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल एकेपी फौंड्रीचे गौतम भंडारे, जेपीएफ मेटाकास्टचे गौरव पंडित, गोकुळ फेरोकास्टचे सनी आहुजा, आईसी फ्लो टेक्नॉलॉजीचे ओंकार हाशिलकर, आयएएस कास्टिंगचे आनंद देसाई यांचा सत्कार केला. तसेच संचित कित्तूर, मधु हाशिलकर, विजय लेंगडे, नारायण जाधव, मधुकर कुडतकर, आप्पासाहेब गुरव, महेश कंग्राळकर या उद्योजकांचा कोलकत्ता येथे आयआयएफचे सदस्यत्व स्वीकारून सत्कार केला.
याप्रसंगी जयंत व सदानंद हुंबरवाडी, पराग भंडारे, विजय मुचंडीकर, रोहन जुवळी, प्रकाश पंडित आदी उपस्थित होते.









