वृत्तसंस्था / नवी दिल्ली
30 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये होणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या फुटबॉलचा ड्रॉ घोषित करण्यात आला.
फुटबॉलचे सामने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तसेच उत्तराखंडमधील हलदवेणी येथे आयोजित केले आहेत. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने पुरुष आणि महिलांच्या फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ जाहीर केला. पुरुष आणि महिला या दोन गटामध्ये प्रत्येकी 8 संघांचा समावेश राहिल. यजमान उत्तराखंडसह 7 अन्य संघ सहभागी होणार आहेत. उत्तराखंड पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे.









