नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
एक जुलैला देशभरामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 वाजता देशातील डॉक्टर्स कम्यूनिटीशी निगडीत सर्व लोकांना संबोधित करणार आहेत. भारतीय चिकित्सा संघ (आईएमए) द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
कोरोना काळाता आपल्या जिवाची तमा न बाळगता प्रत्येक डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भाषणा दरम्यान या महामारीच्या कळात फ्रंटलाईन वर्क्ररने केलेल्या कामगिरीबद्दल व्यक्त होत असतात त्यांची कौतुक करत असतात. आज देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर्स डेचे निमित्त साधत देशातील डॉक्टर्स कम्यूनिटीशी निगडीत सर्व लोकांना संबोधित करणार आहेत.
एक जुलैला देशभरामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. याच दिवशी देशाचे महान डॉक्टर तसेच पश्चिम बंगालचे दूसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यांच्या स्मरणार्थ,आदरार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









