कोल्हापूर :
देशातील निमसरकारी, सहकार, खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शनवाढी संदर्भात जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांना निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. स़डोली येथे जेष्ठ नेते व माजी मंत्री खा. शरद पवार शेकापचे माजी आमदार व जेष्ठ नेते संपतराव पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारा निमीत्तपवार आले होते यावेळी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय सदस्य शिवाजी सावंत,शिवाजी,देसावळे,वसंतराव पाटील,शंकर चौगते,एम.टी.डोंगळे,सर्जेराव दिवसे,आनंदा दिंडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिले.
केंद्रात कॉंग्रेस प्रणित सरकार असताना कमीत कमी एक हजार रू.पेन्शनवाढ झाली याच सरकारने पेन्शनवाढी साठी भगतसिंग कोश्यारींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा, तसेच खासदार व उच्चस्तरीय समिती अशा वेगवेगळ्या नेमलेल्या समित्यांचे पेन्शनवाढीचे सरकारला सादर केलेले अहवाल प्रलंबीत आहेत तसेच दि.४ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा पेन्शनवाढी संदर्भात झालेला निकाल याचीही अंमलबजावणी झालेली नाही,एक दशका पासून पेन्शनर संघटना,राष्ट्रीय समन्वय समिती तालुकास्तरापासून ते दिल्ली येथे अनेक आंदोलने लोकशाही मार्गाने करून देखील सरकारने हा प्रश्न सोडवलेला नाही याची सविस्तर माहिती पवार यांना देण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या
मासिक नऊ हजार रू. पेन्शन मिळावी
पेन्शनला महागाई भत्ता जोडावा
सन १९९५ पूर्वी पासूनचा सेवा काळ पेन्शनवाढ करताना प्राधान्याने विचारात घ्यावा
पेन्शनर मयत झालेस त्यांची पेन्शनजमा रक्कम वारसांना देण्यात यावी
आत्तापर्यन्त तीन लाखापेक्षा अधिक पेन्शनरांचे निधन झाले आहे त्यामुळे सद्या हयात (जिवंत) आहेत त्या पेन्शनरांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळावा या मागणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न होतून पेन्शनरांना पेन्शनवाढीचा लाभ मिळवून द्यावा अशा मागण्या संघटनेने पवार यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









