देशातील 500 हून अधिक स्पर्धकांचा समावेश, आज शेवटचा दिवस, महिला शरीरसौष्ठव स्पर्धकांनीही घेतला उर्त्स्फूतपणे सहभाग
बेळगाव : अंगडी कॉलेज मैदान, सावगांव रोड, बेळगाव येथे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे 16 वी सिनीयर पुरुष शरीरसौष्ठव व महिला मॉडेल फिजिक स्पर्धेला प्रारंभ झाला. देशातील 16 युनिटमधील 500 स्पर्धक व 300 पंच सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आयबीबीएफचे अध्यक्ष रमेशकुमार, सचिव हिरल सेठ, मि. वर्ल्ड प्रेमचंद्र डिगरा, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, मधुकर तळलकर, टी. व्ही. पॉली, भास्करन्, तुलशी सुजल, अजित सिद्दन्नावर, सुनील आपटेकर, बॉबी सिंग आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करुन झाले.या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ बेळगाव, कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर व बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. ही स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या नियमानुसार 55 कि लो., 60, 65, 70, 75, 80, 85, 100 व 100 वरील गटात होत आहे.
23 वर्षानंतर या स्पर्धा बेळगाव शहरात होत आहेत. 2003 साली बेळगाव शहरात प्रथम ‘मि. इंडिया’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. बेळगाव शहर हे शरीरसौष्ठव क्षेsत्रात संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. 16 व्या सीनियर पुरुष महिला स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून रेल्वे, पोलीस, सर्विसीस अशा विविध संघातून 500 हून अधिक स्पर्धक व 250 अधिक ऑफिशियल भाग घेणार आहेत. त्याच बराब्sार विजेत्या स्पर्धकांना दिली जाणारी 25 लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे सतीश जारकीहोळी फाऊंडेशनतर्फे देण्यात येतील. गुरुवारी प्रमुख स्पर्धा होणार असून प्रिपोझिंगमधून निवडलेल्या शरीरसौष्ठवपटूंमधून अंतिम लढत होणार आहे. त्यामधील प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धक मिस्टर इंडिया किताबाचा मानकरी ठरणार आहे. प्रारंभीच महिलांच्या फिजिक स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.









