मुंबई \ ऑनलाईन टीम
नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेबाबत देशभरातल्या जनतेतून हळहळ व्यक्त होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनीही दोषींना कडक शासन करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की,ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.
Previous Articleदिलासादायक! नागपूरमध्ये दिवसभरात 7,266 जणांना डिस्चार्ज
Next Article सक्रिय रुग्ण संख्या दीड हजारांच्या उंबरठय़ावर








