हनुमान जन्मस्थाळावरून चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिक येथे सुरु असलेल्या शास्रार्थ सभेत आज मानापमानाचे नाट्य रंगले. या सभेत मुख्य मुद्दा बाजूला राहून सभेतील महंत आसनव्यवस्थेवरून एकमेकांसमोर उभे ठाकल्याने एकच गोंधळ झाला.
कर्नाटक येथिल किष्किंधा मठाधिपती महंत गोविंददास यांनी किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा वादा केला होता, तयाचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता. महंत गोविंदानी नाशिकच्या महंतांना आव्हान करून अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ आहे हे सिद्ध करण्याचे खुले आव्हान देऊन ते नाशिक मध्ये शास्रार्थ करण्यास दाखल झाले आहेत.
आज 31 तारखेला हा शास्रार्थ चालु होण्यपुर्वीच सभेतील आसनस्थळावरुन वाद रंगला. आसनव्यवस्थेमधील जेष्ठ-कनिष्ठतेवरून काही महंताचा अपमान होत असल्याचा आरोप करण्यात आला. महंत गोविंदानी जेष्ठ महंताच्या आसनावर बसू नये यावरून नाशिकमधील काही महंत आणि महंत गोविंद यांच्यामध्ये काही काळ वाद झाला. यामुळे सभेत वातावरण काही काळ तणाव निर्माण झाले होते.
Previous Articleजम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची दहशत; यांची झाली हत्या…
Next Article भीक मागण्यासाठी पुण्यातून 3 वर्षांच्या मुलीचे अपहरण








