Nashik Bus Accident : औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात ३० ते ३२ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या नागरीकांनी घडलेल्या घटनेचा थरार सांगितला. आम्ही प्रत्यक्ष पाहिले काही लोकांचा आमच्या डोळ्यादेखत पूर्णपणे कोळसा झाला पण आम्ही काही करू शकलो नाही. अग्निशमन विभाग आणि पोलिस वेळेवर पोहचले नाहीत अशी माहिती साक्षीदारांनी दिली. या भीषण दुर्घटनेबद्दल राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर अनेक स्थानिकांनी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला पण आगीमुळे त्यांना मदत करता आली नाही. त्यांनी प्रशासन व्यवस्थेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे घटनेमध्ये जास्त मृत्यू झाल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं.बसच्या आगेची दाहकता एवढी होती की, बसजवळ कुणीच जाऊ शकत नव्हतं. बसपासून ५० फूटावर असलेला बोर्डसुद्धा आगीच्या दाहकतेने जळाला” असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
असा घडला अपघात
शनिवारी पहाटे औरंगाबाद कडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात चिंतामणी ट्रॅव्हल्स येत होती. त्याचवेळी अमृतधाम चौफुली कडून टाकळी रोडच्या दिशेने कोळशाने भरलेला आयशर ट्रक भरधाव वेगात येत होता मिरची हॉटेल समोरील चौफुलीवर या दोन्ही वाहनांची क्रॉस धडक झाली धडक इतकी भीषण होती की बस ने आयशर ट्रकला सुमारे ५०० ते ६०० मीटर ढकलत पुढे नेलं. बसच्या धडकेत आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने पेट घेतला आणि त्यानंतर काही क्षणात बस पेटली. अपघात ग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटा हत्ती वाहनावर जाऊन धडकले. या अपघातात बस चालक जागेवरच ठार झालाय.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








