मुंबई \ ऑनलाईन टीम
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नसिरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी ही माहिती दिली आहे. नसिरुद्दीन शाह यांना न्यूमोनिया झाला असून त्यांच्या फुप्फुसात एक पॅच आढळला आहे. त्यावरील उपचारांसाठी त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नाही. तसेच त्यांना कोविडी किंवा इतर कोणताही आजार नसल्याचे देखील माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.
७० वर्षीय नसीरुद्दीन शाह यांना दोन दिवसांपासून खार इथल्या हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. याच रूग्णालयात दिलीप कुमार यांना मंगळवारी श्वास घेताना अडचणी येत असल्याने दाखल करण्यात आलंय.
नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनिया झालाय. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसात एक पॅच आढळून आलाय. यावर उपचार घेण्यासाठीच त्यांना दोन दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नाही. तसंच त्यांना करोना किंवा इतर कोणताही आजार नसल्याचं त्यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी सांगितलं.