प्रशांत महासागरात परीक्षण सुरू : 115 वर्षांमध्ये 750 हून अधिक त्सुनामी

अमेरिकेचे वैज्ञानिक अंतराळातून त्सुनामीचा शोध घेणाऱ्या एका नव्या मॉनिटरिंग सिस्टीमचे परीक्षण करत आहेत. या सिस्टीमला ‘गार्डियन’ नाव देण्यात आले आहे. प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायरमध्ये याचे परीक्षण केले जात आहे. 115 वर्षांमध्ये (1900-2015 दरम्यान) या भागात 750 हून अधिक त्सुनामी आल्या आहेत. जेल्ट प्रोपल्शन लॅबोरेट्रीच्या वैज्ञानिकांनुसार ‘गार्डियन’चे पूर्ण नाव जीएनएसएस अपर अॅटमॉस्फियर रीयल-टाइम डिझास्टर इन्फॉर्मेशन अँड अलर्ट सिस्टीम आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि उपग्रहाकडून मिळालेल्या रीयल-टाइम डाटानुसार ही यंत्रणा काम करते. समुद्रातील भूकंप, जमीन खचणे किंवा ज्वालामुखी विस्फोटानंतर जेव्हा मोठ्या हालचाली घडू लागतात, यामुळे समुद्रात वादळासारखी स्थिती निर्माण होते, यातून उंच लाटा निर्माण होऊ लागतात. याच लाटांना त्सुनामी म्हटले जाते. या लाटा अत्यंत अधिक वेगाने पुढे जात असतात. अनेकवेळा या लाटांच वेग 800 किलोमीटर प्रतितास इतका असतो.
गार्डियन सिस्टीमला जुन्या वॉर्निंग सिस्टीमचे अत्याधुनिक स्वरुप मानले जात आहे. त्सुनामी येण्यापूर्वी डिस्प्लेस झालेली हवा अन् आयोनिस्फरला धडकणाऱ्या चार्ज्ड पार्टिकल्सचे याच्याकडून निरीक्षण पेले जाते. आयनोस्फियर, पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात बाहेरचा हिस्सा असतो. लाटा जेव्हा निर्माण होतात, तेव्हा हवेचा एक हिस्सा डिस्प्लेस होतो, डिस्प्लेस झालेली हवा लो-फ्रीक्वेंसी साउंड ग्रॅव्हिटी वेव्हजमध्ये फैलावते. हे वेव्हज आणि चार्ज्ड पार्टिकल्स नेव्हिगेशन उपग्रहाचे सिग्नल्समध्ये अडथळे आणतात. या बदलांनाच अलर्टप्रमाणे पाहिले जाऊ शकते. सिग्नलमध्ये अडथळे निर्माण झाल्यावर याला उपग्रहातील त्रुटी म्हणून पाहिले नाही. उलट आम्ही नैसर्गिक धोक्याचा अलर्ट डाटा म्हणून त्याचा वापर करत आहोत. ही सर्वात जलद मॉनिटरिंग सिस्टीम आहे. आयनोस्फियरला धडकणारे चार्ज्ड पार्टिकल्सचे निरीक्षण करण्याच्या 10 मिनिटांच्या आत ही यंत्रणा अलर्ट जारी करणार असल्याची माहिती वैज्ञानिक लियो मार्टायर यांनी दिली आहे.
रिंग ऑफ फायर
रिंग ऑफ फायर असा भाग आहे, जेथे अनेक खंडांसोबत ओशियनिक टेक्टॉनिक प्लेट्स देखील आहेत. हे प्लेट्स परस्परांमध्ये धडकल्यावर भूकंप होतो, त्सुनामी येते आणि ज्वालामुखीचा विस्फोट होत असतो. जगातील 90 टक्के भूकंपप्रवण तर 78 टक्के त्सुनामीप्रवण क्षेत्र याच रिंग ऑफ फायर अंतर्गत येते. हे क्षेत्र 40 हजार किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे. जगातील 75 टक्के सक्रीय ज्वालामुखी याच क्षेत्रात आहेत. जपान, रशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वेडोर, चिली, बोलिविया येथेही याचा प्रभाव आढळून येतो.









