विंध्य पर्वतराजीतल्या अमरकंटक पर्वतावर ऊगम पावते. संगमरवरी दगडासाठी प्रसिद्ध. मेकल पर्वतावर ऊगम. कपिलधारा धबधबा, भीमाची पावले, शोण नदीचा उगम, नर्मदा मंदिर इ.ठिकाणं प्रसिद्ध. अमरकंटक येथील मेकल पर्वतावर असलेल्या सरोवरात ती उगम पावते. अष्टभूजा असलेली, एका हातात शिवलिंग, दुसऱया हातात कमळ, रत्नजडित मुकूट, मगरीचे आसन असा तिचा थाट. तिला अनेक नावांनी ओळखतात.
1) कथा….रेवा पुराण- शंकरापासून निघालेली म्हणून शांकरी. रूद्रापासून म्हणून रूद्रोही. अतिशय लावण्यवती म्हणून सागराने मागणी घातली पण तिने ती झिडकारली.
2) कथा….राजा पुरूरवा आणि ऊर्वशी यांचा संबंध घडल्यावर राजाला पापसंचय झाला असे वाटू लागले. त्याने अमरकंटक येथे तपश्चर्येला सुरूवात केली. खूप वर्षांनी भगवान शंकर प्रसन्न झाले. पापाची कबूली दिली. त्यासाठी स्वर्गातून नर्मदेला भूतलावर आणण्याची विनंती केली. शंकरानी ती दिव्य धारांनी अमरकंटकातील सरोवरात उत्पन्न केली आणि ती पश्चिमेस वहायला लागली. ती खडकाळ भागातून नाचत बागडत हिंडते म्हणून ती उत्पल कन्यका, मोकल टेकडीवरची म्हणून मोकलसुता असेही म्हणतात. तिला रेवानदी म्हणूनही ओळखतात. पुढे दीड मैलावर वृक्षराईमध्ये शोण नदीचा उगम आहे.
3) शोण नदीची रूपक कथा….
नर्मदा ही अमरकंटक राजाची एकुलती एक कन्या, सर्व कलांत पारंगत झाल्यावर शोण राजाशी विवाह ठरवला. पण त्याआधीच अमरकंटकाला मृत्यू आला. नर्मदेला सिंहासनावर बसवले. शोण राजाने आपल्या दूतामार्फत अंगठी पाठवली तर नर्मदेने ती स्विकारून आपल्या प्रेमाचे प्रतीक देवून झोला नावाची रूपवान दासी पाठवली. राजाने नर्मदेला पाहिले नसल्याने तो त्या दासीलाच नर्मदा समजला व तिच्याशी विवाह केला. तिनेही आपण दासी असल्याचे सांगितले नाही. बरेच दिवस झाले, दासी आली नाही म्हणून राणी स्वतः निघाली. ती राजाकडे येण्यास निघाली. झोला पट्टराणी बनून राजाशेजारी बसली होती. झोलाने विश्वासघात केल्याचे तिला तिथे तिला पाहताक्षणीच समजलं. झोलाने आपणच नर्मदा असल्याचे राजास खोटे सांगितले. निराश मनेने नर्मदा मेकल पर्वतावर पोहचली आणि शिवशंकरास प्रार्थना केली. माझ्या देहाचे पाणी होऊ दे, ही तिची प्रार्थना अखेर खरी झाली. तिची नदी बनली, हिच ती नर्मदा नदी. जगन्नाथ पुरीतून जाताना वा परतताना अमरकंटकची यात्रा यात्रेकरु करतात.
कृष्णा नदीची आरती…
सुखसरिते गुणभरिते दुरिते निवारी, निःसंगा भवभंगा चिदगंगा तारी
श्री कृष्णे अवतार जलवेषधारी, जलमय देहे निर्मल साक्षात हरि
जयदेवी जयदेवी जयमाय कृष्णे, आलो तुझीया उदरा निरसी मम तृष्णे
हरिहर सुंदर ओघ ऐक्मयासी आले, प्रेमानंदे बोधे मीळणी मिळाले
ऐसिया संगमी मिसळोनि गेले, रामदास त्यांची वंदी पाऊले..








