)..कथा…ओंकार मांधाता….
मध्य प्रदेशातील दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकार मांधाता. निमाड जिल्ह्य़ातील मोरटक्का स्टेशनपासून जवळच हे स्थान आहे. इथे नर्मदेचे दोन प्रवाह बनतात. एक नर्मदा तर दुसरा कावेरी. त्याच्यामध्ये तयार झालेल्या बेटाच्या भागात हे देवस्थान आहे. हा सगळाच आकार ओंकाराशी मिळताजुळता आहे म्हणून ओंकार तर मांधाताने इथे तप केल्यामुळे ओंकार मांधाता हे नाव प्रसिद्ध झाले. इश्वाकु वंशात युवनाश्य नावाचा राजा होऊन गेला. त्याला अपत्य नव्हते. निराश होऊन राजत्याग केला व वनात भटकत बसला. फिरता फिरता तहान लागली, पाणी शोधत एका यज्ञ वेदिजवळ आला. तिथे पूजेचा कलश ठेवलेला होता, तेच पाणी पिऊन यज्ञ मंडपात झोपला. सकाळीच ऋषिमुनी आले, कलश रिकामा पाहून घाबरले, राजाने ते पाणी प्यायल्याचे कबूल केले, पण ते पाणी गर्भधारणेसाठी अभिमंत्रित केलेले असल्याने राजाच्या पोटात गर्भ वाढीला लागला. नऊ महीन्यांनी तो गर्भ राजाचे पोट फाडून बाहेर आला. पण त्याला दूध कोण पाजणार? इंद्राने ते काम स्विकारले, आपली करंगळी त्याच्या मुखात देऊन त्याचे लालन पालन केले. त्याचे नाव मांधाता. त्याला राज्यात स्वगृही पाठवून राजा तिथेच तप करू लागला.
इथले शिवमंदिर खूप वेगळे आहे. याला तीन मजले आहेत, देव मधोमध नसून तो तळमजल्यावर जरासा बाजूला आहे. परकीय आक्रमणापासून बचावासाठी ही व्यवस्था करण्यात आलीय. मंदिरात तीनही मजल्यावर तीन लिंगे आहेत. मंदिराची धाटणी बौद्ध विहारासारखी आहे. एकाच क्षेत्रात दोन ज्योतिर्लिंग असल्याने अद्वितीय क्षेत्र. दुसऱया ज्योतिर्लिंगचे नाव अमळेश्वर, जे नर्मदेच्या किनारी आहे. याचे दर्शन नंतर घेतात. शिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरलेली असते. छत्तीसगढच्या बिलासपूर येथील मेकल पर्वतावर उगम पावणारी नर्मदा नदी खडकाळ व डोंगर दऱयामधून वाहते.
गंडकी….
या नदीला चक्रनदी, शालिग्रामी, नारायणी, सदानीरा इ.नावे. तिच्या सात प्रवाहातून वाहण्याला सप्तगंडकी असे म्हणतात. पापनाशिनी म्हणून प्रसिद्ध. तिच्या पात्रातील गोटय़ावर एका बाजूस चक्र तर दुसऱया बाजूस वज्रकिडय़ाने पाडलेले छिद्र. विष्णुच्या गालावरील धर्मबिंदूच्या थेंबामुळे ही नदी निर्माण झाली. गंडकीने विष्णु प्रसन्न होण्यासाठी प्रदीर्घ तप केला. त्यामुळेच तिला कोणी मागणी घातली नाही.
क्रमशः








