धीरज कपूर करणार पदार्पण
टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेता म्हणून धीरज कपूरची ओळख आहे. धीरजने ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील अभिनयाद्वारे स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. धीरज आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे. अभिनेता लवकरच बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरीसोबत एका वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये नर्गिस फाकरी आणि दिव्या अग्रवाल मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर धीरज कपूर यात टटलूबाज नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गँग्स ऑफ वासेपूर 2 आणि ब्लडी डॅडीमध्ये काम केलेले अभिनेता जीशान कादरी देखील यात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन विभू कश्यप यांच्याकडून केले जाणार आहे. तर 9पीएम फिल्म्सकडून याची निर्मिती करण्यात येत आहे. नर्गिस याचबरोबर एका चित्रपटात दिसून येणार आहे. नर्गिस मागील काही काळापासून अमेरिकेत वास्तव्य करत आहे. अलिकडेच ती भारतात कामानिमित्त परतली आहे. नर्गिसला बॉलिवूडमध्ये अद्याप स्वत:ची ओळख निर्माण करता आलेली नाही. याचमुळे तिला या सीरिजकडून मोठ्या अपेक्षा आहेत.









