Narendra Dabholkar Murder Case : डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण झाला आहे. या तपासात 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यातील साक्ष पूर्ण झाल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. येत्या तीन आठवड्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टाची देखरेख संपवण्यासाठी आरोपींकडून याचिका दाखल करण्यात आली. मात्र दाभोळकर कुटुंबियांनी या याचिकेला विरोध दर्शविला आहे. नवीन तपास अधिकाऱ्यांकडून अहवास सादर करण्यात आला आहे.
नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा तपास योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप करत दाभोळकर कुटुंबानी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हा तपास हायकोर्टाच्या सूचनेनुसार सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आला. मात्र 10 वर्ष होऊनही खटल्यात प्रगती झाली नाही. दरम्यान, आता आरोपींकडून हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याला दाभोळकर कुटुंबाने विरोध केला आहे. आज कोर्टात सीबीआयने तपास पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. या संदर्भात कोणताही तपास करायचा नाही असा अहवाल दिल्ली मुख्यालयाकडे तपास अधिकाऱ्यांनी पाठवला आहे. यावर अजून निर्णय देण्यात आला नाही.
Previous ArticleSatara : इनोव्हा कारचा भीषण अपघातात 2 महिला जागीच ठार; 5 जण जखमी
Next Article मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द









