बेंगळूर : ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीने जगभारतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुनक यांचे सासरे आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मुर्ती यांनी आपल्या जावयाच्या यशाचे कौतुक केले आहे.
42 वर्षीय ऋषी सुनक हे पंतप्रधान लिझ ट्रस यांच्यानंतर यूकेचे पहिले अश्वेतवर्णिय पंतप्रधान झाले आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्यावर बिकट काळात ब्रिटनचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पडळी आहे. ग्रेट ब्रिटन सध्य़ा अनेक आर्थिक आणि ऊर्जा संकटांशी झुंजत आहे. बोरिस जॉन्सन सरकारमध्ये त्यानी यनायटेड किंगडमच्या चॅन्सलरपदाची जबाबदारी स्विकारली होती. कोरोना साथीच्या काळात त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.
आपल्या जावयाच्या यशावर बोलताना इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश नारायण मूर्ती म्हणाले, “ऋषीचे अभिनंदन…आम्हाला त्याचा अभिमान असून त्याच्या यशासाठी शुभेच्छा. आम्हाला विश्वास आहे की तो इंग्लंडच्या लोकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करेल.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









