दोडामार्ग – वार्ताहर
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ भाजपचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जाहीर सभा आज गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बाजारपेठेतील पिंपळेश्वर सभागृहात ही सभा संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे, आरपीआयचे पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी व शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.









