Narayan Rane Visit in Kolhapur : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खास गावरान शैलीत टीका केली आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून नारायण राणे यांनी अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन असा इशारा दिला आहे. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहित नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहा वेळा निवडून आलो आहे. महिला असेल पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो.अजित पवारांनी बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करावे.माझ्या नादाला लागू नका नाहीतर पुण्यात येऊन बारा वाजवीन असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिलं आहे. कुठलंही अस्तित्व नाही, काही नाही. गेलेले लोक काय म्हणतात आपल्याबद्दल ते पहा.अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं असंही ते म्हणाले. नामांतरावरून सगळेच श्रेय घ्यायला येतील
मी केलं मी केलं असा गजर करतील. पण काय केलं असा सवाल केला. कोणता पक्ष संपवायला मी काही जोतिष नाही.जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात अशी टिकाही त्यांनी केली.
काय म्हणाले अजित पवार
नारायण राणेंनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला होता. सगळे पडले. राणे स्वत: दोनदा पडले. एकदा कोकणात पडले आणि दुसऱ्यांदा मुंबईत वांद्र्यात पडले. तिथं तर महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं… बाईनं…, हे सांगताना अजित पवार यांनी काही हातवारेही करून दाखवले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत अजित पवारांवर जाम खूश झाले आहेत.दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र! असे ट्विटही त्यांनी केलं आहे.
Previous Articleस्व.आप्पासाहेब सारे पाटील समाजभूषण पुरस्कार निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांना जाहीर
Next Article अँटी करप्शनचे अधिकारी असल्याचे भासवत लुटमार









