इतिहासाच्या पुस्तकांमध्ये प्रेंच शासक ‘नेपोलियन बोनापार्ट’बद्दल बरेच काही वाचले असेल. प्रेरणादायी भाषणांमध्येही अनेकदा नेपोलियनचा उल्लेख करण्यात येतो. परंतु आता ‘नेपोलियन’ची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक रिडली स्कॉट यांनी या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला मोठ्या पडद्यासाठी साकारले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. नेपोलियनची व्यक्तिरेखा योकिन फीनिक्सने साकारली असून त्याला ‘जोकर’साठी ओळखले जाते. जोकर चित्रपटासाठी योकिन यांना अकॅडमी पुरस्कार मिळाला आहे. ट्रेलरमध्ये नेपोलियनच्या जीवनातील विविध घटना दर्शविण्यात आल्या आहेत. सोनी पिक्चर्स अन् अॅपल टीव्ही प्लसच्या या चित्रपटात वॅनेसा किर्बी ही महाराणी जोसफिनची भूमिका साकारत आहे. नेपोलियन हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. तर पुढील काळात हा चित्रपट अॅपल टीव्ही प्लसवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असणार आहे. ब्रिटिश दिग्दर्शक रिडली स्कॉट यांना त्यांच्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. ग्लॅडिएटर हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीसाठी मैलाचा दगड ठरला होता.
Previous Articleकंझावला हिट अँड रन, चौघांवर हत्येचा खटला
Next Article सिनेमॅटोग्राफ (दुरुस्ती) विधेयक राज्यसभेत संमत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









