कोल्हापूर/प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या आजच्या प्रश्नावर साहित्यिक, कलावंत विचारवंत यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावं, शेतकरी चळवळीला यातून कालसंगत दिशा मिळावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे चार जूनला जेष्ठ साहित्यीक व प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नांगरट साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
एक दिवशीय हे साहित्य संमेलन असून या संमेलनाला उत्सवी स्वरूप न देता शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी. या चर्चेच्या माध्यमातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी या संमेलनामध्ये ठोस उपाययोजना पुढे याव्यात. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर साहित्यिकांनी लिहावं. त्यांनी मार्गदर्शन करावं. यासाठी हे संमेलन तीन सत्रात होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रामध्ये संमेलनाचे उद्घाटक रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष राजू शेट्टी निमंत्रक कवी संदीप जगताप व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ हे मनोगत व्यक्त करणार आहेत.
Previous Articleयुद्धातील नवी आव्हाने पेलण्यासाठी संशोधन आवश्यक
Next Article हेन्रिच क्लासेनला दंड









