हत्तीणीला रोखण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली
शिरोळ : शिरोळ नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीला राधे कृष्ण एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट, जामनगर (गुजरात) येथे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी सोमवारी (दि. 28) रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान मोठा गोंधळ झाला.
हत्तीणीला रोखण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिसांवर आणि सरकारी वाहनांवर दगडफेक केली. याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी 39 आरोपींसह 100 ते 125 अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी आठ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
या दगडफेकीत 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले, तसेच सात वाहनाचे एक लाख 50 हजार रुपये नुकसान झाले आहे. याबाबतची पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील ‘महादेवी हत्तीणीला नेण्यावरून गेल्या दोन दिवसापासून वाद सुरू होता.
सर्वोच्च न्यायालयाने हत्तीणीबाबत निर्णय दिल्याने सोमवारी सायंकाळी नांदणी येथे मिरवणूक काढून हत्तीला पाठवण्यात येणार होते. या मिरवणूक दरम्यान स्वप्निल इंगळे (रा. जयसिंगपूर) याने तुम्ही आम्हाला का अडवता. तुमच्याकडे काही लेखी आहे का असे म्हणत पोलिसांशी वाद घालून हत्ती कसे घेऊन जाता हे बघतोच असे म्हणून जमावाला चितावणी दिल्यामुळे हल्ला करण्यात आला.
नांदणी येथील भरत बँक चौक ते दिगंबर जैन अतिशय क्षेत्र परिसरात संशयित आरोपींनी पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता जोरदार विरोध करत शासकीय कामात अडथळा आणला. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, 7 शासकीय वाहनांचे अंदाजे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणी स्वप्निल इंगळे, भूषण मोगलाडे, रतन चौगुले, पारस मगदुम, अमन सनदी, प्रतिक समगे, आकाश मिरजकर, कुमार माने, कुलभुषण पाटील, सुशांत धयाडे, नितांत घबाडे, संस्कार पाटील, सुरज सावगावे, अक्षय मानगावे, नागेंद्र मानगावे, वैभव मानगावे, अक्षय ऐनापुरे, चेतन ऐनापुरे, रोहित लाले, भुषण ऊळागड्डे, सम्मेद लाले, प्रशांत कुगे, सौरभ जांगडे, राहुल पाटील, प्रतिक मगदुम, वर्धमान मादनाईक, प्रथमेश मादनाईक, आदित्य मादनाईक, अनिकेत चौगुले, गोमटेश मगदुम, प्रज्वल मगदुम, सम्मेद पाटील, सक्षम पाटील, सुधीर पाटील, पार्श्व पाटील, सागर शंभुशेटे, डॉ. सागर पाटील, स्वस्तिक पाटील, दिपक कांबळे आणि 100 ते 125 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सम्मेद पाटील, (वय 21 रा इनाम धामणी मिरज), भूषण मुंगलाडे ,(वय 26 रा. शाहू नगर जयं सगपू र,) रतन चौ गु ल s (वय 25 रा उदगाव,) अमननुलला सनदी (वय 20 राहणार नांदणी), प्रतीक समगे (वय 27 रा. चिपरी,), आकाश मिरजकर (वय 26, राहणार हरोली), कुमार सिद्धू माने,( वय 34 रा. हरोली,) कुलभूषण पाटील (वय रा. नांदणी), यांना जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.








