रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी रुपये मंजूर
वार्ताहर /धामणे
नंदिहळ्ळी ते गर्लगुंजी या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी रुपये ग्रामीणच्या आमदार व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याने या रस्त्याच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून नंदिहळ्ळी ते गर्लगुंजी हा महत्त्वाचा रस्ता असून बेळगाव आणि खानापूर तालुक्यांना जोडलेला आहे. त्यामुळे या रस्त्याने सर्वप्रकारच्या वाहनांची वर्दळ या रस्त्याने आहे. हा रस्ता नंदिहळ्ळीपासून दीड किलोमीटर बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येतो. त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नंदिहळ्ळीपासून दिड किलोमीटर हा रस्ता नव्याने भराव घालून रस्त्याची उंची वाढविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यावर बोर्डर व खडीकरण करण्यात येवून डांबरीकरण करणार असल्याचे संबंधीत सूत्रांकडून सांगण्यात आले. नंदिहळ्ळीपासून थोड्या अंतरावर या रस्त्यावर नाला असून या नाल्याच्या पाण्यामुळे पावसाळ्यात दोन वर्षांपूर्वी हा रस्ताच वाहून गेला होता. त्यामुळे आता या रस्त्याच्या एका बाजूला जवळजवळ 30 ते 35 मीटर लांबीचा आरसीसी रस्ता व संरक्षक भिंत उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.









