पोक्सो अतंर्गत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वारणानगर / प्रतिनिधी
मोहरे ता. पन्हाळा येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या नंदगाव ता. करवीर येथील प्रथमेश कुराडे या तरुणास कोडोली पोलिसांनी पोक्सो अंतर्गत अटक केली.
पिडीत विद्यार्थीनी वर्गात शिक्षण घेत असताना तिला आरोपी प्रथमेश शाळेच्या खिडकीतून हाताने बाहेर येण्यास खुनवत होता सदर बाब शाळेच्या शिपायाच्या लक्षात आलेवर त्यांस हडकवण्यात आले. प्रथमेश तिला नेण्याच्या उद्देशाने चार चाकी वाहन घेवून आल्याची चर्चा आहे.पिडीत मुलीच्या ओळखीचा प्रथमेश आहे तो फोनवर संपर्क करत होता. सदर बाब नातेवाईक यांच्या लक्षात आलेवर तिने प्रथमेश सोबत बोलने बंद केले होते पिडीत पन्हाळा पायथ्याच्या गावातील आहे परंतु मोहरे येथे शिक्षण घेत होती.
कोडोली पोलीस ठाणेत पिडीतेने दिलेल्या फिर्यादी नुसार प्रथमेश कुराडे विरुद्ध भा.द.वि.स. ३५४ (ड), बा. लै. अ. सं. १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आल्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड यानी सांगून तपास फौजदार दांडगे करीत आहेत.









