रत्नागिरी :
कोकण रेल्वेने कोलाड (महाराष्ट्र) आणि वेर्णा (गोवा) दरम्यान अलिकडेच सुरू झालेल्या रो-रो कार वाहतूक सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रोडवर अतिरिक्त थांबा जाहीर केला. प्रवाशांसाठी सुविधा आणि सुलभता वाढवणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक मागणी आणि प्रवाशांच्या अभिप्रायाला प्रतिसाद म्हणून हा थांबा सुरू करण्यात आला आहे, असे कोकण रेल्वेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. मात्र मागणी असूनही रत्नागिरी जिल्ह्यात थांबा न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रवासी आता नांदगाव रोडवर त्यांची कार लोड आणि अनलोड करू शकतात, ज्यामुळे कार मालकांसाठी प्रवास अधिक लवचिक आणि वापरण्यास सोयीस्कर होईल. रो-रो कार वाहतूक सेवेसाठी कार बुकिंगसाठी नोंदणी 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्रत्येक सेवेची क्षमता 40 गाड्यांपर्यंत असेल (प्रती वॅगन 2 गाड्या). 18 ऑगस्टपर्यंत मिळालेल्या एकूण बुकिंगमध्ये प्रती ट्रिप 16 गाड्यांपेक्षा कमी असल्यास, ही सेवा चालविली जाणार नाही आणि नोंदणी शुल्क परत केले जाईल.
एकदा गाड्या रो-रो ट्रेनमध्ये लोड केल्या गेल्या की, ड्रायव्हर किंवा कोणत्याही सह-प्रवाशाला गाडीत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. गाडीतील प्रवाशांना रो रो ट्रेनशी जोडलेल्या पॅसेंजर कोचमध्ये (थ्री ए सी आणि 2एसी बसून) प्रवास करावा लागेल, त्यासाठी त्यांनी निर्धारित प्रवासी भाडे भरावे लागेल.
प्रत्येक कार बुकिंगसाठी जास्तीत जास्त 3 प्रवाशांना ( थ्री एसी वर्गात 2 एसी प्रवाशांना आणि 2एसी वर्गामध्ये 1 प्रवाशांना) परवानगी असेल. जर काही अतिरिक्त प्रवासी असतील तरच त्यांना जोडलेल्या कोचमध्ये रिकाम्या बर्थ/सीट असतील तरच परवानगी दिली जाईल.
- मालवाहतूक शुल्क :
कोलाड – वेर्णा: प्रति कार 7875 ऊपये (5 टक्के जीएसटीसह)
कोलाड – नांदगाव: कारचे दर प्रती व्यक्ती 5460 ऊपये (जीएसटीसह)
प्रत्येक गाडीसाठी 4000 ऊपये नोंदणी शुल्क (5 टक्के जीएसटीसह ) लागू असेल, उर्वरित मालवाहतूक प्रवासाच्या दिवशी प्रवासाच्या सुऊवातीच्या स्टेशनवर भरावी लागेल.
नोंदणीचे ठिकाण:
कोलाड – वेर्णा मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक कार्यालय, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई; संपर्क क्रमांक 9004470973








