नंदगडमध्ये अवतरली ज्ञानाची पंढरी
वार्ताहर/हलशी
एकादशीनिमित्त सरकारी उच्च प्राथमिक मराठी संत मेलगे विद्यालय नंदगडच्या विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी नंदगडमध्ये अनुभवली. रविवार दि. 6 रोजी संत मेलगे प्राथमिक मराठी शाळा नंदगड येथील शालेय विद्यार्थ्यांकडून शाळेमध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 11 वाजता दिंडीची सुरुवात करण्यात आली. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील विविध शाळांमध्ये दिंडी सोहळ्dयाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या सोहळ्dयात मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह
शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषा परिधान करून दिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा करून वारीत सहभागी झाले होते. विठ्ठल-नामाचा गजर, अभंग आणि भजने गात दिंडी काढण्यात आली.









