नंदगड प्रतिनिधी -नंदगड ग्रामपंचायत सदस्यांचे धरणे आंदोलन मागे घेऊन, पंचायतीचे टाळे खोलले आहेत. याबाबत उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदार यांनी जाहीर केले. ग्रामपंचायतीला ठोकलेले टाळे खोलण्यात आले, त्यानंतर पंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू झाले . शुक्रवार सकाळी ग्रामपंचायत सदस्यांनी सकाळी जाहीर केले प्रमाणे ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतू ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात आल्याचे समजले असता खानापूर तालुका पंचायत अधिकारी विरणगौडा हेगण्णगौडा यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट दीली व ग्रामपंचायत सदस्यांची चर्चा केली. धरणे सत्याग्रहात सहभागी झालेले उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्यांनी, जोपर्यंत जिल्हा पंचायतीचे अधिकारी येऊन या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचारची चौकशी करत नाहीत, तोपर्यंत टाळे खोलले जाणार नाहीत. अशी भूमिका घेतलेली होती. त्यावेळी तालुका पंचायत अधिकारी यांनी याबाबत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौकशी करून दोषीवर निश्चित कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच पंचायतीला ठोकलेले टाळे खोलण्यात आले, त्यानंतर ग्रामपंचायतचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. यावेळी उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदार म्हणाले जर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौकशी होऊन दोषीवर कारवाई झाली नसल्यास, पुन्हा टाळे ठोकून आंदोलन करू. याबाबत यानंतरच्या परिणामाला शासन जबाबदार राहील असे जाहीर केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









