महिलांकडून उत्स्फूर्त स्वागत : सजीव देखाव्यांचे सादरीकरण
वार्ताहर/नंदगड
येथील दुर्गा दौडीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. युवक, युवतींसह नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. रोज पहाटे 5 वाजता लक्ष्मी मंदिरपासून दौडीला सुरुवात होत आहे. विविध गल्ल्यातून फिरून नियोजित स्थळी दौडीची सांगता होत आहे. नंदगड येथील बाजारपेठेत उत्स्फूर्तपणे दौडीचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी संभाजी महाराजांचा सजीव देखावा युवराज किशोर बिडकर याने सादर केला.









