जनतेनेच दिले संगोळ्ळी रायण्णा एक्सप्रेस बससेवा असे नाव
वार्ताहर /नंदगड
गेल्या कित्येक वर्षापासून नंदगड-बेळगाव बससेवेला सुरुवात करावी, अशी कित्येक वर्षापासून प्रवासीवर्ग व विद्यार्थ्यांची मागणी होती. यासाठी बऱ्याच वेळा संबंधित बसप्रमुखांना निवेदन देण्यात आले होते. आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. शेवटी बुधवारी या बससेवेला सुरुवात करण्यात आली आहे. खानापूर बस आगारातर्फे नंदगड-बेळगाव बससेवेला सुरुवात झाली आहे. ही बस सकाळी 9 वाजता नंदगडहून बेळगावला जाणार आहे. या बससेवेमुळे खानापूर व बेळगावला शाळा व महाविद्यालयासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. शिवाय ही बस नंदगड येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्dयापासून सुरुवात होत असल्याने या बसला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नंदगड परिसरातील जनतेनेच या बसला क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा विशेष एक्सप्रेस बस असे नाव दिले आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्dयाजवळ या बसच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली. कसबा नंदगड ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी श्रीफळ वाढवून बससेवेला सुरुवात केली. यावेळी नंदगड ग्रा. पं. सदस्य मन्सूर तासीलदार, नागो पाटील, संदीप पारीश्वाडकर, लक्ष्मण बोटेकर, बेकवाडचे सदस्य रूक्माणा झुंजवाडकर, आप्पाजी पाटील, नंदगड, क. नंदगड, बेकवाड, ग्रा. पं.हद्दीतील अनेक मान्यवर, विद्यार्थी व प्रवासी, नागरिक उपस्थित होते.









