► प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना महासंघातर्फे नंदादीप हॉस्पिटल बेळगाव शाखेमध्ये सर्व माजी सैनिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा लाभ 100 हून अधिक जणांनी घेतला. याचवेळी माजी सैनिकांसाठी
याच शिबिरामध्ये माजी सैनिकांसाठी ण्प्एिं सेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी जीवनविद्या मिशनची विश्व प्रार्थना करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. शिबिरामध्ये सहभागी सर्व माजी सैनिक व वीर पत्नींची मोफत नेत्र तपासणी करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष जगदीश पुजारी, जनरल सेव्रेटरी शिवबसप्पा काडनावर, भीमसेन तेनगी, गणपती देसाई, महिला अध्यक्ष सुनीता पट्टणशेट्टी यांनी सहभाग घेऊन मनोगत व्यक्त केले.
नंदादीप नेत्रालयतर्फे सूत्रसंचालन आनंद तुप्पद यांनी केले. नंदादीपच्या वैद्यकीय संचालक व मुख्य नेत्रतज्ञ डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी या सेवेचा लाभ सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवाराने घ्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी नंदादीपचे व्यवस्थापक इरया मस्तमार्डी, कार्यकारी व्यवस्थापक अनिऊध्द सूर्यवंशी, ओटी प्रमुख आनंद तुप्पद व सर्व कर्मचारी उपस्थित होते.









