वार्ताहर / बेंगळूर
कॉमेड-के युजीइटीचा शनिवारी निकाल लागला असून पहिल्या दहापैकी पाच क्रमांक कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. गुणवत्ता यादीत बेंगळूर येथील एन. नंद गोपीकृष्णा याने प्रथम क्रमांक पटकावला असून हरियाणाच्या मानस अग्रवाल आणि बेंगळूरच्या सिद्धार्थ पामिडी यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.
दरम्यान, 90 ते 100 टक्केवारीतील 8,130 रँकपैकी 2,543 उमेदवार कर्नाटकातील आहेत. त्याचप्रमाणे 7,719 उमेदवार 80 ते 90 पर्सेंटाइलचे आहेत. त्यापैकी 2,157 कर्नाटकातील आहेत. एकूण परीक्षा दिलेल्या उमेदवारांची संख्या 96,607 पैकी 78,250 परीक्षेला हजर झाले होते. पात्र उमेदवारांचे रँक कार्ड उमेदवारांना त्यांच्या अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कॉमेड-के वेबसाइट www.comedk.org
वर उपलब्ध आहेत.









